कर्जतचे सुपुत्र मोहसीन शेख यांना डॉक्टरेट पदवी बहाल

कर्जत प्रतिनिधी : दि १ मार्च
कर्जत तालुक्यातील महसूल मित्र मोहसिन शेख तथा मंडळ अधिकारी राहाता यांना “किंग्डम ऑफ टोंगा – ऑस्ट्रेलिया” या देशातील आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीने प्रशासकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरेट ही पदवी दिल्ली येथील कार्यक्रमात नुकतीच प्रदान केली. एशिया पॅसिफिक चेंबर ऑफ कॉमर्स व कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांचा संयुक्त पदवीदान समारंभ दिल्ली येथे रविवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी भारतीय सिनेमा सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल, विद्यापीठ प्रो.व्हाईस चान्सलर डॉ.रिपू रंजन शाह, विद्यापीठ अधिष्ठाता डॉ प्रियदर्शी नायक आदी मान्यवर उपस्थित होते. मोहसीन शेख हे मिरजगाव ता. कर्जतचे सुपुत्र आहे. त्यांनी महसुल विभागात अनेक उल्लेखनीय कार्य पार पाडले आहे. यापूर्वी शेख यांनी आपल्या सेवाकाळात अनेक राज्यस्तरीय आणि विभागीयस्तरीय पुरस्कार मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.