निबंध स्पर्धांमधून छत्रपतींचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचतात : आमदार जगताप
स्नेहबंधतर्फे आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्याने स्नेहबंध फौंडेशनने आयोजित केलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धा खऱ्या अर्थाने विधायक आहेत. अशा स्पर्धांमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचवण्याचे विधायक कार्य घडते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
स्नेहबंध फौंडेशनने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, संजय शिंदे, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले म्हणाले, स्नेहबंधच्या माध्यमातून उद्वव शिंदे सातत्याने अनेक विधायक उपक्रम राबवत असतात. त्यामुळे स्नेहबंधचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.
चित्रकला स्पर्धेत गौरी ज्ञानेश्वर विधाटे, चेतन पांडुरंग शेलार, सलोनी विजय चोटीले, स्वदीप प्रदीप खराडे यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला, तर उन्नती नितीनकुमार शेटीया, संभाजी पोटभरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
निबंध स्पर्धेत अक्षता दत्तात्रय वडवणीकर ,पायल संजय पराते यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय तर
भास्कर बन्सी गोत्राळ, राखी वैभव गुगळे यांनी तृतीय क्रमांक, तर अश्विनी वसंत पवार, सोनल तरटे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक आराधना विशाल गायकवाड हिला प्रदान करण्यात आले.