राजकिय

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची शुक्रवारी महत्वाची बैठक

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा कुठल्याही दिवशी होऊ शकते या निडणुकीसाठी इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी व जिल्हातील पक्ष बांधणी संदर्भात जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय महामेळावा मनसेचे नेते मा.बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे व हा महामेळावा अभूतपूर्व असा व्हावा यांसाठी जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.या महामेळाव्याच्या तयारीसाठी मनसे पक्ष कार्यालय मुंबई येथुन मनसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,सचिन डफळ व मनसेचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे व संपूर्ण जिल्हाभरात या समितीचा दौरा चालू आहे.याच अनुषंगाने या समितीची पाथर्डी शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांबरोबर महत्वाची बैठक शुक्रवार दि.०४/०३/२२ रोजी सकाळी १०:०० वा.शासकीय विश्रामगृह,पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी सांगीतले की मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण पाथर्डी तालुक्यात मनसे ने नेत्रदीपक कामगिरी बजावलेली आहे त्यामुळें येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्ष सरस कामगिरी करेल असा विश्वास कार्यकर्त्या मध्ये आहे.नगर परिषद,पंचायत समिती मध्ये नेहमी तेच ते पदाधिकारी निवडून देण्याची मानसिकता आता मतदारांमध्ये नाही,जनता आता नवीन,उत्साही व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्याला या सर्वसामान्य नागरीकांच्या दैंनदिन गरजाशी निगडीत असलेल्या ठिकाणी पाठवणार आहे व मनसे या दृष्टीने एक चांगला पर्याय नागरिकांसमोर देणार आहे,
पाथर्डी तालुका स्तरावर शुक्रवारी होत असलेल्या पक्षाच्या या महत्वाच्या बैठकीसाठी व त्यानंतरच्या मा.बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील महामेळावा साठी जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात येत असुन या बैठकीनंतर पक्षाच्या शहर व तालुका कार्यकारणी मध्येही अनेक बदल घडवुन नवीन होतकरू तरुणांना संधी देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.सबब वरील उल्लेख केल्याप्रमाणे दि.०४/०३/२२ रोजी च्या या अतिशय महत्वाच्या बैठकीसाठी पक्ष प्रवेशासाठी नवीन इच्छुक कार्यकर्त्यांनी व पक्षाच्या सर्व पदाधिकऱ्यांनाही उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यानी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे