कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव शिवपुत्र पुरस्काराने सन्मानीत
कर्जत प्रतिनिधी : दि २ मार्च
कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेद्वारा राज्यस्तरीय “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने” सन्मानीत करण्यात आले.
जळगाव नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेद्वारा राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवपुत्री महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाच्या २०२१ साली प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना हा पुरस्कार देत सन्मानीत करण्यात आले. यावेळी संपादक विकास भदाणे, माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, साहित्यिक अशोक राणा, वीरमाता निलाताई कौतीक-आमले आदी उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.