देश-विदेश

लालपरीचे चाक रुतलेलेच!

60 दिवसांच्या संप काळात सुमारे 35 कोटींचे नुकसान

नगर(प्रतिनिधी)जन सामन्यांना वाहतुकीसाठी परवडणारे साधन म्हणजे एसटी (लालपरी) राज्यात प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी कर्मचार्यानी संप पुकारल्यामुळे आजही लालपरीचे चाक रुतलेलेच आहे.
राज्य सरकारचे परिवहन मंत्रालय एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतील, असे कितीही सांगत असले तरी एसटीचे चाक संपामुळे रुतलेलेच आहे. राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच दिसताे. ज्या अहमदनगर जिल्ह्यातून पहिली एसटी बस धावली तिथेही संपाचे पडसाद आजही तीव्र आहेत. या ६० दिवसाच्या संप काळात महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयाचे सुमारे ३५ काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एक प्रकारे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर पाणी फिरले. आजही संपात २ हजार ५१४ कर्मचारी सहभागी आहेत. त्यातील २९० जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अहमदनगरच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून मिळाली. संगमनेर, अकाेले, जामखेड, पाथर्डी हे आगार वगळता गेल्या आठ दिवसांपासून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इतर आगारातून बसच्या काही प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्याचा दावा अहमदनगर विभागीय नियंत्रक कार्यालयाने केला आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आगारातून बसच्या दरराेजच्या शंभरपेक्षा अधिक फेऱ्या हाेत आहेत. यातून दरराेजचे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. पण मिळत असलेले हे उत्पन्न नुकसान भरून काढणारे नाही. अहमदनगर जिल्हा भाैगाेगिलदृष्ट्या माेठा आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न देखील चांगले असते. संपामुळे सर्वाधिक आर्थिक नुकसान अहमदनगर विभागीय नियंत्रक कार्यालयाचे झाल्याचे दिसते. संपावर अजून तरी ताेडगा निघताना दिसत नाही. संप असाच चालू राहिल्यास त्याचा भविष्यात विपरीत परिणाम हाेताना दिसतील, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. संपातून काही संघटनांनी माघार घेतल्यानंतर सुमारे तेराशे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, अशीही माहिती अहमदनगर विभागीय नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे