पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे – मनीषा लहारे

केडगाव (प्रतिनिधी) दि.१मार्च
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाणीव ठेवून आपणही निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे ‘ असे आवाहन गिनीज बुक व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त, समाजसेविका व पर्यावरणप्रेमी मनीषा लहारे यांनी केले आहे. महाशिवरात्री दिनाचे औचित्य साधून जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण मा.श्री. अण्णासाहेब हजारे यांना आदर्श मानून ‘ वृक्षारोपण करू या , पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या ‘ या संकल्पनेने प्रेरित होऊन कै. मच्छिंद्र तुकाराम लहारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केडगाव, भूषणनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिवमंदिर येथे मनीषा लहारे, लता लहारे व वरदराज यांनी वृक्षारोपण केले.
यामध्ये बेल, कडूलिंब, बदाम, आपटा तसेच मोठी सावली देणारे वृक्ष अशा वेगवेगळ्या रोपांचा समावेश होता.
मनीषा लहारे या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य या संस्थेमध्ये २००४ पासून कार्यरत आहेत.
याप्रसंगी केडगाव , भूषणनगर येथील ओंकारेश्वर मित्र मंडळातील सदस्य अमोल पतंगे, ओंकार सातपुते, प्रथमेश घोडके, शुभम परदेशी, सिद्धार्थ काळे, हर्षल चौधरी, अभिजित काळे, अभिषेक चौरे, आदित्य वायभासे, निखिल ताठे , बाबु चहाळ, विशाल देशमुख, सचिन कुलकर्णी, इंदर बिद्रे आदी उपस्थित असून या रोपांचे संगोपन व संवर्धन योग्य होणार असे सांगितले .