प्रशासकिय
सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय नविन जागेत स्थलांतरीत
अहमदनगर दि. 22 (प्रतिनिधी) :- सर्व कामगार, आस्थापना मालक, व्यवस्थापन नागरिकांना कळविण्यात येते की, सध्या सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय हे आशिष बंगला, सथ्था कॉलनी, खालकर हॉस्पिटल शेजारी, स्टेशनरोड, सहाय्यक अहमदनगर या पत्त्यावर कार्यरत होते. आता सदर कार्यालय दिनांक 1 मार्च 2022 पासुन सं.न. 7686 ए, प्लॉट नं. 3, मुलजी निवास, बालिकाश्रम रोड, बागडे मळा, चोभे हॉस्पिटल, अहमदनगर येथील नविन जागेत स्थलांतरीत होत आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नि.कृ.कवले यांनी केले आहे.