डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी आंबेडकरी समाज आयुक्तांना निवेदन देणार!
अतिक्रमित असलेले हॉटेलचे बांधकाम पाडण्याची आंबेडकरी समाजाची बैठकीत मागणी

अहमदनगर( प्रतिनिधी ):- दि.१९ फेब्रुवारी रोजी अहमदनगर शहरातील समस्त आंबेडकरी समाजाची बैठक ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयासाठी डॉ.आंबेडकर स्मारक टिळक रोड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित अभिवादन करुण पार पडली.समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने एकमुखाने ठराव केला की सदरील ठिकाणी मनपा प्रशाशन ने तात्काळ दखल घेऊन आंबेडकरी समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्याच्या आत अतिक्रमकीत असलेले पुतळ्याच्या जागेतले हॉटेल सुखसागर चे बांधकाम पाडून त्या ठिकाणी भव्य असा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी मागणी सर्वानी केली आहे.म्हणून येत्या २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने महापालिका आयुक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले आहे. या बैठकीला अहमदनगर शहरातील व तसेच जिल्ह्यातील भिमसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.