सामाजिक

देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांचा सत्कार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांविषयी चर्चा

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 19 जून : अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनला नुकतीच नूतन पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांची नियुक्ती झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक वैद्य यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते सुखदेव साळवे उपस्थित होते. यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घडलेल्या विविध गुन्ह्यांविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व गुन्ह्यांचा तपास करून निपटारा केला जाईल. तसेच हद्दीतील क्राईम रेट कमी करून तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे