देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: मुंबई (प्रतिनिधी) दि. 9 जून: राज्यभर मातंग समाजाचे अ, ब,क, ड उपवर्गीकरण व्हावे यासाठी अहिल्यानगर मातंग समाजाच्या वतीने माननीय आमदार अमितजी गोरखे यांची मंत्रालय मुंबई येथे जाऊन मातंग समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वात व ॲक्टिव्ह मराठी उद्योग समूहाचे महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे (पत्रकार) यांनी अ, ब, क,ड उपवर्गीकरण संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत अहिल्यानगर सकल मातंग समाजाच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार अमितजी गोरखे यांनी असे आश्वासन सकल मातंग समाज बांधवांना दिले की लवकरच अहिल्यानगर शहरात सकल मातंग समाज मेळावा घेण्यासाठी आपण तारीख जाहीर करणार आहोत. व अ, ब, क, ड. उपवर्गीकरणासंदर्भात आपण दिलेले निवेदन शासनाकडे अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येईल. असे म्हणाले.
त्याचप्रमाणे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना प्रति महिना 15 हजार रुपये प्रमाणे मानधन देण्यात यावे . तसेच एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये विनामूल्य प्रवास मिळविण्यासाठी माननीय नामदार प्रतापराव सरनाईक परिवहन मंत्री यांची मुंबई मंत्रालय येथे समक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मंत्री महोदय यांनी असे आश्वासन दिले की आपल्या मागण्या मंत्रिमंडळात मंजूर करण्याचे प्रयत्न करील असेही आश्वासन दिले . सर्व समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी निवेदन देताना संतोष शेलार सतीश खळवे राजेंद्र आल्हाट संजय शेलार प्रमोद आरणे शेषराव कारखेलेकर संजय विरूळे गोविंद सूर्यवंशी अविनाश साठे लक्ष्मण तिकटे. सुदामराव आवाडे व सकल मातंग समाज उपस्थित होता.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा