गुन्हेगारी

स्वस्तामध्ये सोने देतो अशी अमीष दाखवुन लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद 05 आरोपीकडुन 26,52,000/-रु कि.चा. मुद्देमाल जप्त

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 9 मे : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अविनाश अनिल नलावडे रा. सणसवाडी ता.मानगाव जि.रायगड यांना दिनांक 04/06/2026 रोजी सायंकाळी 07/00 ते 07/30 वा.चे सुमारास बुरुगाव गावचे शिवारात रेल्वे उड्डाणपुलाजवळ ता.जि. अहिल्यानगर येथे इसम  राजु मोहिते व अक्षय मोहिते दोघे रा. नांदेड यांनी फिर्यादीकडे कामास राहुन त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादीस वेळोवेळी स्वतात सोने देतो असे अमिष दाखवुन आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वरील ठिकाणी बोलावुन घेवुन त्यांना लोखंडी रँड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन रोख रक्कम सोन्याचे दागिणे असे एकुण 52,80,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत अहिल्यानगर, तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 496/2026 भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 310(2), 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना आदेशित केले होते.
त्यानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोउपनि/ अनंत सालगुडे पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, सुनिल पवार, फुरकान शेख, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन पथकास दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
वर नमुद पथकाने दरोड्याचे गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी हे झेंडीगुळा लोणी ता.किनवट जि. नांदेड येथे त्यांचे घरी असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ झेंडीगुळा लोणी ता.किनवट येथील आरोपींचे घरी छापा टाकुन त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते वय- 52 वर्षे रा. झेंडीगुळा लोणी ता.किनवट जि.नांदेड 2) राजु उर्फ चंदु रामदास मोहिते वय-36 वर्षे रा. सदर, 3) अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते वय-27 वर्षे रा. मालठा ता.हातगाव जि.नांदेड, 4) छगन दशरथ मोहिते वय-36 वर्षे रा. याडी ता.नेर जि. यवतमाळ, 5) दिनेश सुदाम जाधव वय-24 वर्षे रा.दगडवाडी, ता.हातगाव जि.नांदेड असे असल्याचे सांगितले. ताब्यात आरोपीतांना सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीचे कब्जातुन 16,50,000/-रु रोख रक्कम, 1,90,000/-रु कि.चे सोन्याचे दागिणे, 8,00,000/-रु कि.ची एक स्विप्ट कार, बनवाट सोन्याचे नाणी, कोयता असा एकुण 26,52,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करुन त्यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे