गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केलेले 02 इसम जामखेड येथुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दिनांक 7 मे:  06/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हयातील हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा जामखेड शहरामध्ये शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारामार्फत हद्दपार इसम 1) सोनु कुंदन वाघमारे, 2) विक्रम भगवान डाडर हे हद्दपार आदेशाचा भंग करुन विनापरवाना जामखेड शहरात आरोळेवस्ती येथील शेतामध्ये बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर माहितीचे आधारे पथकाने बातमीतील इसमांचे आरोळेवस्ती जामखेड येथे शोध घेता दोन इसम  मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्यांचे नांव 1) सोनु कुंदन वाघमारे वय- 34 वर्षे, 2) विक्रम भगवान डाडर वय- 37 वर्षे दोघे रा. आरोळेवस्ती जामखेड, ता.जामखेड असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाचे हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्यांना दिनांक 13/02/2025 पासुन 01वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यामधुन हद्दपार केलेले आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/2630 सुनिल रमेश मालणकर नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जामखडे पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हद्दपार केलेले इसम विनापरवाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत असल्याचे दिसुन आल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे