गुन्हेगारी

सुंगधीत तंबाखु व गुटखा वाहतुक करणारे 3 आरोपीकडुन 69,79,400/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 7 मे :प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मा. श्री मुम्मका सुदर्शन साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ दिपक मेढे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले होते.
दिनांक 05/05/2026 रोजी वरील पथक हे संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्येे पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत काही इसम हे आयशर टेम्पोमध्ये अवैधरित्या तंबाखु व गुटखा हे संगमनेर मार्गे पुणे येते घेवुन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ सदर माहिती श्री प्रदिप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांना कळवुन त्यांना कारवाईकामी बोलावुन घेतले.
पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह हिवरगाव टोल नाका येथे जावुन सापळा लावुन थांबले असता एक विटकरी रंगाचा आयशर संगमनेर कडुन पुणेकडे येतांना दिसुन आली तेव्हा पथकाने सदर गाडीवरील चालकास गाडी बाजुला घेण्यास सांगुन गाडीतील इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नांवे 1) कन्हैय्यालाल कालुराम गेहलोत वय-29 वर्षे रा. मांडा ता.मारवाड जि.पाली, राजस्थान, 2) प्रदिपकुमार हरीशंकर कुंवार वय-23 वर्षे रा. सोहरामऊ, ता. हसनगंज जि. उन्नाव मध्यप्रदेश, 3) लक्ष्मण बस्तीराम पवार वय-22 वर्षे रा. पुनाईता ता.जि.पाली, राजस्थान असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसम नामे कन्हैय्यालाल कालुराम गेहलोत यास ताब्यातील गाडी व गाडीतील मालाबाबत विचारपुस करता त्याने गाडीमध्ये गुटखा व सुंगधीत तंबाखु असुन ते वापी गुजरात येथुन भरुन ते 4) निलेश ललवानी(पुर्ण नांव माहित नाही)(फरार) येथे घेवुन जात असल्याचे सांगितले
ताब्यातील इसमांचे कब्जातुन 28,44,000/-रु कि.चे प्रीमीयम आर एम.डी. पानमसाला 3160 पुडे, 4,56,000/-रु कि.चे एम सेंटेड तंबाखु 760 पुडे, 12,06,400/-रु कि.चे रजनिगंधा सुगंधीत पानमसाला 1160 पुडे, 2,43,000/-रु कि.चे तुलसी 00 रॉलय जाफरानी जर्दा सुंगधीत तंबाखुचे 1080 पुडे,
22,00,000/-रु कि.ची एक आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.43 बी.एक्स 2779, असा असलेला,30,000/-रु कि.चे तीन मोबाईल असा एकूण 69,79,400/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द पोना/2293 राहुल कचरु डोके नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 248/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, सह अन्न सुरक्षा माणके अधिनियम 2006 व नियमन 2011 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे