सांत्वन

“आमच्या अतुलला भेटायला आले का…. Sssss” “जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला” रिपब्लिकन सेनेने घेतली शेलार कुटुंबियांची सांत्वनपर भेट! शेवगाव – पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांना मात्र विसर

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर (पाथर्डी ) दि. 8 ऑक्टोबर : ” आमच्या अतुला भेटायला आले का…. Sssss” असा टाहो शेलार कुटूंबि्यांनी डोळ्याच्या कडा पाणावल्या
“जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला” या ओळीप्रमाणे प्रमाणे पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे घडलेली दुर्दैवी घटना, मागच्या महिन्यात संपूर्ण राज्यात पावसाने कहर केला. पावसाच्या या रुद्र रूपामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, अनेक कुटूंबे उध्वस्त झाली. याच पावसाने 20 सप्टेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील जवळच असणाऱ्या शिरापूर गावातील अतुल रावसाहेब शेलार (वय. 30) या तरुणाचा पावसाच्या पुरामुळे बळी गेला.रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशा नुसार रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शेलार कुटूंबाबियांची सांत्वनपर भेट घेत धीर दिला. वडील रावसाहेब शेलार येथील ग्रामपंचायत कार्यालयात तूटपुंज्या पगारावर शिपाई म्हूणन नोकरी करत आहेत, परंतु त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांची सर्व कामे अतुलच करायचा, यावेळी संवाद साधताना वडील रावसाहेब शेलार म्हणाले, तो आमच्या कुटुंबातील मोठा मुलगा होता त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता . गावातील कोणालाही तो कोणत्याही कामासाठी नाही म्हणत नव्हता, असा आमचा आधार हरपला. येत्या दिवाळीमध्ये त्याचे लग्न होणार होते. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. त्याच्या अपघाती जाण्याने आमच्या जगण्याची आशाच मावळली असल्याचे ते म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मताची झोळी भरण्यासाठी आमच्या दाराचे उंबरठे झिजविणाऱ्या आमदार मोनिकाताई राजळे यांना आमच्या डोंगराएवढ्या दुःखात आमची भेट घेण्याचा विसर पडला, असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खासदार निलेश लंके भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी भेट घेतली परंतु मदत मात्र शून्य!

यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संपादक महेश भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जवखेडे येथील ज्येष्ठ नेते विजयराव सोनवणे, पाथर्डी तालुक्याच्या रिपब्लिकन सेनेच्या महिला तालुका अध्यक्षा कविताताई सोनवणे, वाघमारेताई, युवा नेते अमोल जाधव, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे