विंड वर्ड इंडीया लिमिटेड (पॉवरकॉन) कंपनीतील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधुन दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड
अहमदनगर दि. 12 (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 06 मे 2024 रोजी विंड इंडीया लि. (पॉवरकॉन) पवनचक्की प्रकल्प खांडके शिवार, ता. नगर येथे अनोळखी 5 ते 6 इसम त्यांचे ताब्यातील 2 टेम्पो व एका मोटार सायकलवर प्रकल्पाचे आत येवुन सुरक्षा रक्षक चंद्रकांत ठोंबरे याचे हातपाय बांधुन ठेवले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने स्वत:ची सुटका करुन प्रकल्पाचे सुपरवायझर श्री. संभाजी पालवे यांना फोन करुन सदर ठिकाणी बोलावुन घेतले असता अनोळखी आरोपींनी सुपरवायझर व सुरक्षा रक्षक यांचेशी झटापट व मारहाण केल्याने ते जवळील मेहकरी गांव गेले व गांवातील लोकांची मदतीने आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी ताब्यातील 1 टेम्पो, 1 मोटार सायकल व चोरी केलेले विद्युत वाहक खांड सोडुन पळुन गेले बाबत नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं. 456/2024 भादविक 395, 427 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 10/06/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार भाऊसाहेब काळे, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे व अरुण मोरे अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करतांना वापरलेली व सोडून गेलेल्या वाहनांचे मदतीने तपास करुन आरोपींना ताब्यात घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. स्थागुशा पथक मिळुन आलेल्या मोटार सायकलचे मदतीने आरोपींची माहिती घेत असताना मोटार सायकल क्रमांक एमएच/16/डीजे/7736 ही प्रशांत बाळु चांदणे रा. सोनेवाडी, ता. नगर याचे मालकीची असल्याचे समजल्याने पथकाने त्याचा राहते घरी शोध घेता 1 इसम मिळुन आला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) प्रशांत बाळु चांदणे वय 22, रा. सोनेवाडी, ता. नगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे मोबिन अन्सारी, रा. कॅम्प कैलारु, सर्जेपुरा, अहमदनगर, सुरजीत गुंजाळ, रा. माथनी, ता. नगर, महेश पवार, रा. निबोंडी, ता. नगर व त्याचे 2 मित्र अशांनी मिळुन केल्याचे सांगितल्याने
//2//
आरोपीचे इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी 2) मोबिन मेहबुब अन्सारी वय 25, रा. कॅम्प कैलारु, सर्जेपुरा, अहमदनगर हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडे गुन्ह्यात चोरी केलेल्या माला बाबत अधिक विचारपुस करता त्यांनी सदरचा माल हा बजरंग शाळे जवळील भंगार व्यवसायीक सागर कुकरेजा, रा. अहमदनगर यास विक्री केल्याचे सांगितले. आरोपींचे इतर साथीदार आरोपी 3) सुरजीत गुंजाळ, रा. माथनी, ता. नगर (फरार), 4) महेश पवार, रा. निबोंडी, ता. नगर (फरार) व 5) सागर कुकरेजा, रा. अहमदनगर (फरार) यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. ताब्यातील दोन्ही आरोपींना नगर तालुका पो.स्टे.गु.र.नं. 456/2024 भादविक 395, 427 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.