राजकिय

पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, शाम कांबळे यांनी केला जिल्हा परिषद दरेवाडी गटात निवडणूक लढण्याचा निर्धार!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 20 नोव्हेंबर:  आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगर पालिका यांच्या निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत, यामुळे ऐन कडक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापल्याचे सर्वत्र चित्र आहे. जिल्हा परिषद दरेवाडी गट अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी राखीव झाला आहे. यात अनेकजण निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, बऱ्याच उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी आहे. पण कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतानाही नागरिकांचे प्रश्न सुटावेत या भावनेतून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते शाम मुरलीधर कांबळे यांनी आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी देशस्तंभ न्यूजशी बोलतांना ते म्हणाले
पत्रकार आणि मैत्री प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष म्हणून नगरशहर आणि तालुक्यात मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहे.
असं म्हणतात सुरुवात गावापासून करावी म्हणून…
दशमीगव्हाण येथे मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात प्रथमच नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले. या शिबिराच्या माध्यमातून 40 लोकांना नवी दृष्टी देण्याचे काम केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या. आणि विचारांची जयंती साजरी केली.
गावातील गुणी विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी कौतुकाची थाप दिली.गावाचे नाव मोठे करणा-या विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
लोकशिक्षणासाठी वाचनालये महत्त्वाचे असतात या भावनेतून नगर शहरात तपोवन रोड परिसरात मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाचनालय सुरु केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सन २०२० मध्ये नगर शहरात प्रथमच रक्तदान शिबिर आयोजित केले आणि हा उपक्रम सध्या अखंडितपणे सुरु आहे.
कुठल्याही पेशंटला जर रक्त पिशवीची गरज असली तर आज एका फोनवर रक्त पिशवी उपलब्ध करून देण्यात येते. किंवा वेळेला स्वतः रक्तदात्याची भूमिका बजावली जाते.
कोरोना संकटकाळात आपल्या स्वतःची जीवाची पर्वा न करता, संकटात सापडलेल्या प्रत्येकाला माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात दिला!
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार बंद झाला. त्याकाळात गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. मैत्री प्रतिष्ठानच्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मित्रांच्या आर्थिक सहकार्यातून अन्नधान्य किराणा देत, गरिबांची चूल पेटवण्याचे काम केले.
संकटाच्या महामारीत कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नव्हते. अशा संकटात ऑक्सिजनची आवश्यकता असणा-या रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात वेळेनुसार बेड्स उपलब्ध करुन दिले. अनेकांना प्लाझ्माची आवश्यकता पडली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाजमा ,रेमडीसीवर उपलब्ध करुन दिले.
घरी उपचार घेणाऱ्या पेशंटसाठी बंदच्या काळातदेखील ऑक्सिमीटर उपलब्ध करुन दिले.
आष्टी तालुक्यातील केळ पिंपळगाव येथील रस्त्याचे काम अनेक वर्षे झाले नव्हते.
आपण एक दिवस प्रवास केला तरी इतका त्रास होतो. तर दररोज प्रवास करणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांच्या अवस्था काय असेल? याचा विचार केला आणि हा प्रश्न सोशल मीडिया, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सोडवला.नऊ किलोमीटर पैकी सहा किलोमीटरचा रस्त्याचे काम मार्गी लागले.
कुठलाही संबंध नसताना, आपला जिल्हा नसताना प्रश्न सोडवला.
स्वतःचा वाढदिवस हॉटेलमध्ये साजरा न करता,
फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून ,ज्यांना गरज आहे अशा गरजवंताना शैक्षणिक वस्तू दिल्या.
वंचित आदिवासी आणि गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत, या उदात्त भावनेतून त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले.
पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
बंद पडलेले पथदिवे , स्वतः पाठपुरावा करून चालू केले.
रस्ता दुरुस्तीचे काम झाले पाहिजे यासाठी थेट अभियंत्यांना भिडलो!
अशा अनेक छोटे-मोठे, गरज असेल तेथे समाजासाठी, गोरगरिबांच्या हक्कांसाठी उभा राहिलो ,काम करत आलो !
अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीत दरेवाडी गट अनुसूचित जाती वर्गासाठी आरक्षित झाला आहे. चल सामान्यांच्या विश्वासावर ही निवडणूक मी लढवण्यासाठी इच्छुक आहे. याबाबत राजकीय पक्षाकडून माझा विचार जरूर होईल असा विश्वास त्यांनी देशस्तंभ या प्रसार माध्यमातून व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे