देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर : दि. 20 नोव्हेंबर : जिल्हा रुग्णालय म्हणचे उपचारासाठी आलेल्या जिल्ह्यातील गोरगरीबांचे आरोग्य सेवा मंदिर!
आरोग्य सेवा मंदिर हि ओळख आता पुसायला लागली आहे. जिल्हा रुग्णालया विषयी गोरगरीबांना आता भीती वाटायला लागलीय, दोन ते तीन दिवसापूर्वी स्वछतेच्या नावाखाली ऐन कडाक्याच्या थंडीत नवीन महिला वार्डमध्ये भिंतीवर पाण्याचे फवारे उडवून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वछता राखणे हे महत्वाचेच आहे, परंतु ती करण्या अगोदर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे हा नियम आहे, नियमाला अक्षरशः आनंद स्वयं रोजगार संस्थेच्या अडाणी कंत्राटी कामगार, अडाणी सुपरवायझर कामगारांनी कमालच करत, नियमांना केराची टोपली दाखवत येथील महिला वार्डात भिंतीवर अंदाधुंद पाण्याचे फवारे मारले. या प्रकरामुळे महिला रुग्ण आराम करत असताना अचानक अंगावर पाणी पडल्यामुळे रुग्ण व नातेवाईक हे भयभीत होऊन पळापळ सुरु झाली. या कंत्राटी कामगारांच्या अंगावर संस्थेचा कोणतीही ड्रेस नाही. याच महिला वार्डात दोन तीन वर्षापूर्वी जळीतकांड झाले होते. यावेळी 13 ते 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. अंदाधुंद पाण्याचे फवारे मारल्याच्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन व रुग्णालय व्यवस्थापन यांच्या भोंगळ कारभारा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत काय कायदेशीर कारवाई होणार अशा चर्चा रुग्ण, नातेवाईक, व नागरिक करत आहेत. एकंदरीतच आता काय कारवाई होणार रुग्णाच्या जीवाशी अंत्यत गंभीर प्रकाराला कायम स्वरूपी आळा बसेल का? याकडे रुग्णालयातील नातेवाईक, व अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा