देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 नोव्हेंबर : आगामी होऊ घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह शहरात देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
आगामी अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रभागात इच्छुक उमेदवार ‘राजकीय फिलडिंग’ लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीला साततत्याने सहकार्य करणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी कार्यरत असलेले सुरेशभाऊ बनसोडे हे प्रभाग क्रमांक 13 मधून महानगर पालिकेच्या निवडणुकीस सामोरे जाणार असल्यामुळे प्रभागात तरुणाई, आबाल वृद्ध, महिला यांच्या मध्ये सुरेशभाऊ बनसोडे नावाची आली आहे, लाट! विरोधकांना महानगर पालिका निवडणुकीत घरची वाट! अशा चर्चा झडत आहेत. प्रभागातीलच नव्हे तर कोणत्याही सर्व सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न, वीज, पाणी, रस्ते, हे कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो, त्यामुळे या प्रभागातील लढतीकडे नागरिकां मध्ये उत्साही वातावरण दिसत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा