देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर:-नगर तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करणे कामी व शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या कार्यालयावर शालेय पोषण आहार संघटना सीटुने आयोजित केलेल्या मोर्चाच्या नियोजनाच्या तयारी बाबत मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये १५,१६ व १७ ऑक्टोबर रोजी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चासाठी आपल्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष कॉ कल्याणी रायकर यांनी केले.
मीटिंग चे प्रस्ताविक अनिल रायकर यांनी करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी सीटुचे नेतृत्वाखाली मालेगाव येथील आंदोलनात प्रत्येक केंद्राने मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबतचे मार्गदर्शन केले .कॉम्रेड प्रविण सोनवणे यांनी या वेळी सांगितले की इतिहासामध्ये सुद्धा कामगारांना छोट्यातील छोट्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाचेच हत्यार उपसावे लागले आहे, त्यामुळे यावेळी सुद्धा आपल्याकडे आंदोलनाशिवाय कोणताच पर्याय नाही.जो पर्यंत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सर्व मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल असा निर्धार उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
कॉ. आशा आंधळे यांनी बैठकीचा समारोप केला. समारोपामध्ये सर्वांनी हम होंगे कामयाब हे गीत गायले.
मीटिंगसाठी नगर तालुक्यातील सर्व केंद्रांतील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा