जादू

जिल्हा आयुष च्या नावात रात्रीची जादू! पहा काय आहे नेमकी जादू!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर: दि: 6 ऑक्टोबर : अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण झाल्यानंतर जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांचे नामफलक अहमदनगर वरून अहिल्यानगर करण्यात आले आहे. परंतु याला अपवाद ठरत आहे ती आयुष्य रुग्णालयाची देखणी इमारत!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या इमारतीचे उद्घाटन केले, इमारतही अत्यंत सुंदर आणि देखणी आहे, परंतु आज कालच्या डिजिटल युगात देखील जिल्हा रुग्णालयाचा गाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांना या इमारतीच्या नावाचा फलक अजूनही बदलता आलेला नाही. भर दिवसा या इमारतीच्या नावाचा फलक ‘जिल्हा आयुष रुग्णालय, अहमदनगर’ अशा आशयाचा ‘ दिसत आहे.
रात्री या फलकाच्या नावात एक वेगळीच जादू पाहायला मिळते, रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नेहमीच जादू दृष्टीक्षेपात पडते. नावाची जादू म्हणजे चक्क “जिल्हा आयुष……. अहमद” एवढेच रात्रीच्या वेळी वाचावयास मिळते. जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा हाकणाऱ्या कारभाऱ्यांचे या गंभीर विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. अहिल्यानगर शहरात विविध जिल्ह्यातून येणारे जाणारे नागरिक आहेत. अशा आशयाचा फलक वाचल्यामुळे जिल्हा आयुषचा हा फलक चर्चेचा म्हणजेच थट्टेचा विषय बनला आहे विषय बनत चाललेला आहे. याकडे आरोग्य विभागाचे कारभारी असे देणार आहेत की नाही? अशा प्रश्नार्थक चर्चा शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे