देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 8 जुलै:
अहिल्यानगर : हिंदसेवा मंडळ संचलित सीताराम सारडा विद्यालयातील शाळकरी विध्यार्थी खून प्रकरणी रिपब्लिकन सेनेने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला नुकतेच स्मरणपत्र दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, बुधवार दि. 25 जून रोजी शाळेच्या वेळेत शाळकरी विध्यार्थ्याचा खून झाला, या बाबतीत शाळेचे मुख्याध्यापक यांचे निलम्बन करून शिक्षक व इतर कर्मचाऱ्यावंर कठोर कारवाई व्हावी. अशा आशयायचे निवेदन दि. 30 जून रोजी माध्यमिक शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्याचे स्मरण शिक्षण विभागाला देण्यात आले. तसेच आठ दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे उपोषण करण्यात येईल, असा ईशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.व सदर उपोषणास प्रशासन जबाबदार असल्याचे स्मरण पत्रात नमूद केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा