देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: दि. 8 जुलै : अहिल्यानगर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम घेण्यासाठी आंबेडकरी समाज पुतळा समितीची बैठक 5 जुलै रोजी झाली. यावेळी 27 जुलै हि तारीख सर्वानुमते ठरविण्यात आली.
आंबेडकरी चळवळीच्या समाजाच्या वतीने शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती व्हावा, यासाठी बराच संघर्ष केला. यासाठी लोक प्रतिनिधी या नात्याने आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी देखील शासन दरबारी पाठपुरावा केला.एकंदरीतच सर्व समाज बांधवाच्या त्यागाने व पाठपुराव्याने आज शहरात दि. 27 जुलै रोजी पूर्णाकृती पुतळा अनावरण होत आहे. पण समाजातील काही महाभाग महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर राजकीय स्टंट करून समाजाची दिशाभूल करत करत आहेत. समाजाची एक बैठक झाली असतांना अनावरानाची तारीख ठरली असतांना स्वतंत्र बैठक घेऊन नेमके काय साध्य करायचे आहे? हा प्रश्न समाजाला पडला आहे.
पुतळा अनावरण कार्यक्रमा साठी महानगर पालिका प्रशासन व पुतळा समितीच्या वतीने शासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप महानगर पालिका प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.
या कार्यक्रमासाठी पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या गायनाच्या होणार असून भन्ते राहुल बोधी व रिपब्लिकन नेत्यांच्या उपस्थित हा भव्य, दिव्य कार्यक्रम होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास समाजाने मोठया संख्येने उपस्थित राहून भीमशक्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा