ब्रेकिंग
नियमित रेशन मिळत नसल्याने दरेवाडी, गोकुळवाडी, हरिमळा भागातील नागरिक त्रस्त! सरकारमान्य रेशन दुकानदार मात्र मस्त!, नागरिकांना दिली जातात उडवा उडवीची उत्तरे
महिन्यात फक्त तीन ते चारच दिवस असते दुकान उघडे!

देशस्तंभ न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 13 जुलै: सरकारमान्य रास्त भाव दुकान हे गोरगरीब नागरिकांना वेळेवर धान्य गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, तेल हे वेळेवर व रास्त भावात मिळावे. यासाठी असते, परंतु बऱ्याच शहरी व ग्रामीण भागात सर्व सामान्य गरीब नागरिकांना वेळेवर रेशन मिळत नसल्याचे समोर आले आहे.
अहिल्यानगर शहराच्या जवळच असलेल्या दरेवाडी येथे रेशन दुकानात (दुकान नंबर: 33) नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. दरेवाडी भागातील रेशन दुकानात दरेवाडी, गोकुळवाडी, हरीमळा, तुक्कड ओढा आदी भागातील नागरिक रेशनकार्ड धारक आहेत. या भागातील नागरिकांना नियमित रेशन मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून दुकानदार मात्र मस्त असल्याची भावना परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.रेशन बाबत विचारायला गेल्यास नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.
महिन्यात फक्त तीन ते चारच दिवस रेशन दुकान सुरु असते,त्यामुळे परिसरातील नागरिकांना गर्दीत ताटकळत उभे राहावे लागते, त्यातच बऱ्याच वेळ उभे राहूनही रेशन मिळते की नाही याची खात्री नाही, एक महत्वाची बाब म्हणजे सरकार मान्य रास्तभाव दुकानदराने रेशन दुकानाच्या फलकावर “शासकीय आदेशानुसार दररोज आठ तास व आठवडा बाजारच्या दिवशी दुकान पूर्णवेळ उघडे राहील.”अशी टिप लिहिलेली आहे.
त्या पद्धतीने दुकान उघडे नसते म्हणजेच रेशन दुकानदाराच शासकीय आदेशाचे पालन करीत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. सदर रेशनदारावर कडक कारवाई अशा भावना व्यक्त होत आहेत. रेशन दुकान महिन्याभरात कमीत कमी 15 दिवस तरी उघडे असावे, सर्वांना नियमित रेशन मिळावे अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.याबाबत जिल्हा पुरवठा विभाग काय कारवाई करते हे महत्वाचे आहे.



