गुन्हेगारी

गोळीबाराच्या घटनेमधील दोन मुख्य आरोपी पुणे येथुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि. 02/06/2025 रोजी फिर्यादी प्रमोद रामदास घोडके रा. दत्तमंदीर शेजारी, ढवणवस्ती, तपोवन रोड, अहिल्यानगर हे डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी गेला असता आरोपीतांनी फिर्यादीस बोलावुन तु ऋषी ढवण याचे सोबत राहण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व भिमराज आव्हाड याने त्याचे हातातील पिस्टलमधुन दोन राऊंड फायर केले होते. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 593/2025 बी. एन. एस. 2023 चे कलम 109(1), 115(2), 352, 189 (2) (4), 191 (2)(3), सह आर्म ऍ़क्ट कलम 3/25, 27 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वर नमुद गुन्ह्यातील 3 आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशन यांनी अटक केलेले होते. परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळुन गेलेला होता. मा. पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, अशोक लिपणे, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी पथकास रवाना केलेले होते.
दिनांक 15/06/2025 रोजी पथक गोपनिय माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी  भिमराज आव्हाड व राहुल सांगळे हे केसनंद, ता. जि. पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने पुणे या ठिकाणी जावुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी  1) भिमराज गेणुजी आव्हाड वय 58 वर्षे, रा. नित्यसेवा, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर, 2) राहुल विजय सांगळे वय 33 वर्षे, रा. शिवनगर, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी नामे भिमराज गेणुजी आव्हाड यांचेविरुध्द यापुर्वी मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल असुन तो सदर गुन्ह्यातुन जामीनावर आहे. तसेच आरोपी नामे राहुल विजय सांगळे याचेविरुध्द दंगा, मारहाणीचे 2 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातील आरोपीतांना गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा. श्री. अमोल भारतीे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे