आरोग्य व शिक्षण

947 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1090 बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.60 टक्के!

अहमदनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 947 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 67 हजार 125 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.60 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1090 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 9727 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 757 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 183 आणि अँटीजेन चाचणीत 150 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 209, अकाले 04, जामखेड 61, कर्जत 15, नगर ग्रा. 67, नेवासा 60, पारनेर 38, पाथर्डी 18, राहता 01, राहुरी 05, संगमनेर 17, शेवगांव 48, श्रीगोंदा 131, श्रीरामपूर 62, कॅन्टोन्मेंट बोर्ड 04, इतर जिल्हा 16 आणि इतर राज्या 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 19, अकोले 07, कोपरगाव 26, नगर ग्रा. 05, नेवासा 03, पारनेर 02, पाथर्डी 02, राहाता 62, राहुरी 07, संगमनेर 05, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 13, कॅन्टोनमेंट बोर्ड 02, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 150 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 34, अकाले 02, जामखेड 10, कर्जत 07, कोपरगाव 03, नगर ग्रा. 10, नेवासा 05, पारनेर 01, पाथर्डी 24, राहाता 11, राहुरी 08, शेवगांव 14, श्रीगोंदा 09, श्रीरामपूर 10 आणि मिलिटरी हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 323, अकोले 81, जामखेड 35, कर्जत 09, कोपरगाव 13, नगर ग्रा 72, नेवासा 34, पारनेर 27, पाथर्डी 43, राहाता 38, राहुरी 43, संगमनेर 39, शेवगांव 35, श्रीगोंदा 38, श्रीरामपूर 49, कॅन्टोनमेंट बोर्ड 04, मिलिटरी हॉस्पिटल 18, इतर जिल्हा 44 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:3,67,125*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:9727*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:7187*

*एकूण रूग्ण संख्या:3,84,039*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे