देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि, 7 फेब्रुवारी(प्रतिनिधी ) मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, हृदय घोडके, सुरेश माळी, संतोष लोढे, संदीप दरंदले, मयुर गायकवाड, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे व महादेव भांड अशांचे पथक तयार करुन पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.दिनांक 07/02/2025 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तिसगाव, ता.पाथर्डी गावामध्ये रविवार पेठ येथे सद्दाम शेख हा त्याचे घरामध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवले आहेत व कत्तल करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष तिसगाव मधील रविवार पेठ येथील एका घराचे बाहेर दोन वासरे बांधलेली दिसुन आली व एक घरामध्ये काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.पथकाचे कारवाई दरम्यान एक इसम पळून गेला. ताब्यातील इसमांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) सद्दाम हारूण शेख, वय 28, रा.तिसगाव, ता.पाथर्डी 2) इरफान गफुर शेख, वय 32, रा.तिसगाव, ता.पाथर्डी 3) रिजवान मोहमंद शेख, वय 37, रा.सदर बाजार, भिंगार, अहिल्यानगर 4) आसिफ याकुब सय्यद, वय 40, रा. सदर बाजार, भिंगार 5) वसीम मोहमंद कुरेशी, वय 32, रा.सदर बाजार भिंगार 6) आदिल अमिन कुरेशी, वय 21, रा.सदर बाजार, भिंगार 7) जावेद हारूण शेख, वय 27, रा.तिसगाव, ता.पाथर्डी असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याचे नाव 8) इरफान फौजमोहमंद कुरेशी, रा.रविवार पेठ, तिसगाव, ता.पाथर्डी (फरार) असे असल्याचे सांगीतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे गोमांस करत असलेले घराची माहिती विचारली असता सदरचे हे सद्दाम हारूण शेख याचे असून त्याचे सांगणेवरून गोवंशी जनावरांची कत्तल केलेबाबत सांगीतले.पथकाने घटनाठिकाणावरून 60,000/- रू किं.त्यात 300 किलो गोमांस, 10,000/- रू किं.त्या दोन गोवंशी जातीचे वासरे, 5 लोखंडी सुरे असा एकुण 70,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीविरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं.108 /2025 बीएनएस 2023 चे कलम 271, 325, 3 (5) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा