अहिल्यानगर दि.18 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसापासुन प्रत्येक उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारावर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा डागत होते . आज अखेर विधानसभा निवडूनकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी याच प्रमुख पक्षांमध्ये खरी लढत आहे. आता कोण निवडून येणार, कोणाची सत्ता येणार अशा चर्चा नागरिकां मधून होत आहेत.
अहिल्यानगर नगर शहर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यातच प्रमुख लढत आहे. नगरकर नेमका मतांचा कौल महायुतीच्या विकास कामाकडे देणार कि महाआघाडीच्या पारड्यात टाकणार? याबाबतीत नगरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.विजयाचा गुलाल कोण घेणार हे येत्या 23 तारखेलाच कळणार आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा