अहिल्यानगर दि. 18 (नोव्हेंबर ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराची बैठक केडगाव येथील समतानगर येथे जेष्ठ नेते सुनील शिंदे,युवा नेते अतुल भिंगारदिवे यांच्या वतीने बैठक घेण्यात आली.
या बैठकिचे अध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव येथील समतानगरच्या समाजमंदिरा साठी पाठपुरावा केल्यामुळे समाज मंदिर उभे आहे. महिलांना वाव मिळावा म्हणून होम मिनिस्टर सारख्या स्पर्धाचे आयोजन केले. आमदार संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा आमदार व मंत्रीपदावर विराजमान करण्यासाठी आपण घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी नाना पाटोळे, अमित काळे, समीर भिंगारदिवे, अंकुश मोहिते,सुजित घंगाळे, सुमेध गायकवाड, सिद्धार्थ आढाव, अतुल भिंगारदिवे, अनिकेत आरोळे व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्तीत होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा