गुन्हेगारी
तहसील कार्यालयातील लिपिक ५० हजार रुपयांच्या लाचेच्या जाळ्यात!

अहमदनगर दि.२७ जुलै( प्रतिनिधी):. शेवगाव तहसील कार्यालयातील लिपिक ५० हजार रुपयांच्या लाचेच्या जाळ्यात सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तहसिल कार्यालयातल्या गौण खनिज लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केली आहे.सदर लिपिकानं फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती.त्यापैकी ५० हजार रुपये घेतांना लिपिकाला रंगेहात ताब्यात घेण्यात आलेले आहे.