सामाजिक

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बहुजन रयत परिषद कार्यरत आहे: ऍड.कोमलताई साळुंखे (ढोबळे) बहुजन रयत परिषदेने केला गुणवंत विद्यार्थी, कलावंत यांचा सन्मान!

अहमदनगर (प्रतिनिधी) गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बहुजन रयत परिषद कार्यरत आहे. कोरोना सारख्या महामारीमुळे बँड् पथकांना व कलावंतांना काम नव्हते.बहुजन रयत परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमातून कलावंतांना कला सादर करण्याचे काम या अहमदनगर जिल्ह्याने केले हे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेश अध्यक्षा एड.कोमलताई साळुंखे (ढोबळे) यांनी बहुजन रयत परिषदेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निम्मित शहरातील ओम गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात केले.यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप,प्रदेश उप अध्यक्ष प्रा.ना. म.साठे,प्रदेश सरचिटणीस ईश्वर शिरसागर, कॉ.अनंत लोखंडे, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र वाकळे,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना कोमलताई साळुंखे म्हणाल्या,महिला बचत गट हा शासनाचा उत्कृष्ट उपक्रम आहे.पण केवळ माहिती अभावी ते सक्षमपणे चालत नाही.बचतगट सहा महिने चांगला चालविला तर तुम्ही लघुउद्योग उभे करू शकता. त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे बचतगट सुरू करावा.पुढे बोलतांना त्या म्हणाल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केवळ दलित मागासवर्गीय यांचे हित पाहिले नाही तर संपूर्ण देशातील बहुजन समाजाचे हित पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमास शुभेच्छा देताना आमदार संग्राम जगताप म्हणाले बहुजन रयत परिषदेचे संस्थापक माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब मंत्री असताना त्यांच्यावरची जबाबदारी चोखपणे बजावलेले ते मंत्री आहेत.बहुजन रयत परिषदेच्या कामाला आम्ही देखील साथ देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील वाटेगाव या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गावावरून आलेले त्यांचे वंशज,नातू सूरज साठे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उप अध्यक्ष प्रा.ना. म.साठे यांनी करत संघटनेच्या जडण घडणीत माजी मंत्री व संघटनेचे संस्थापक प्रा.ढोबळे सर यांचा किती मोलाचा सहभाग असल्याची माहिती देत.गाव तिथे संघटनेची शाखा करणार असल्याची भूमिका मांडली.यावेळी शाहीर अशोक शिरसागर यांनी अण्णाभाऊ साठे यांची गीते सादर केली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निम्मित जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी,उत्कृष्ठ कलावंत ,यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.यावेळी उपस्थित पत्रकार महेश भोसले,संतोष गोरखे,शुभम पाचारणे,सचिन मोकळ,भारत पवार,मेजर भिमराव उल्हारे,उमेश साठे,यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाअध्यक्ष गायकवाड,जिल्हा उप अध्यक्ष सत्यवान नवगीरे,जिल्हा सरचिटणीस संतोष साळवे,शहर अध्यक्ष सतीश थोरात,सामाजिक कार्यकर्ते संजुभाऊ ताकवाले आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास साहेबराव पाचारने,विजय वडागळे,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष रतन ससाणे,अप्पा घोडके,आदींसह जिह्यातील व शहरातील कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे