ब्रेकिंग
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक संरक्षण भिंतीचे काम युद्धस्तरावर चालू!
आंबेडकरी चळवळीच्या आंदोलनाचा दणका!

अहमदनगर (प्रतिनिधी) नगर शहरातील डॉ.आंबेडकर स्मारकाच्या संरक्षण भिंतीमूळे कडाक्याची थंडी असूनही वातावरण चांगलेच तापले आहे.
याबाबत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी 25 जानेवारीपासून आंदोलनाची भूमिका स्विकारली असल्याने महापालिका प्रशासनाला चांगलीच धडकी भरली असल्याच्या चर्चा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमधून होत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथील चालू असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी करताना अजय साळवे,जयंत गायकवाड, सुनिल शिंदे,सुरेश भाऊ बनसोडे,प्रतिक बारसे,बंडू भाऊ आव्हाड,अंकुश मोहिते,सिद्धार्थ आढाव ,सतीश साळवे,जय कदम,सुशील शिंदे आदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नेते उपस्थितीत होते.