सामाजिक

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा समाजभूषण पुरस्कार प्रकाश पोटे यांना जाहीर. गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते होणार पुरस्काराने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार 2023 जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांना नुकताच जाहीर करण्यात आला. सदर पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष भारत कांबळे यांनी नुकतीच केली.
प्रकाश पोटे हे मागील 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रामीण व शहरी भागात जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक प्रश्नांना वाचा फोडत आहेत. सामाजिक उपक्रम राबवत समाजातील वंचित घटकांना संघटित करून न्याय देण्याचे काम ते सातत्याने करत आहे. महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी व राष्ट्रीय सण, उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन समाजातील गरजूंना आधार देण्याचे काम करत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता व्यक्तीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी कटीबद्ध असून आदी समाजोपयोगी कार्य सातत्याने सुरु आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला असल्याचे भारत कांबळे यांनी सांगितले. गुरुवार दि. 2 मार्च रोजी प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते आडगाव (ता. पाथर्डी) येथे होणार्‍या कार्यक्रमात पोटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, घनश्याम आण्णा शेलार, बाळासाहेब हराळ, संदेश कारले, रोहिदास कर्डिले, शरद पवार, चंद्रकांत पवार, अमित गांधी, दीपक गुगळे, शहानवाज शेख, गौतमीताई भिंगारदिवे, श्रीपाद वाघमारे, अमोल भंडारे यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे