प्रभाग क्र.२ मधील खासगी शाळा मध्ये होतीय आर्थिक लूट साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नावाखाली अनाधिकृतपने आकारली जाते फी

अहमदनगर दि.१८ जानेवारी (प्रतिनिधी) :- नगर शहरातील प्रभाग क्र २ मधील तवले नगर येथील साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नावाखाली अनाधिकृतपने आकारली जाते फी याबाबत शिक्षणाधिकारी अरुण कडूस यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी निवेदन दिले.
साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नावाखाली अनाधिकृतपने आकारली जाते फी याची कुठेच नोंद नसल्याने फी च्या नावाखाली होत असलेली आर्थिक लूट कोणाच्या घशात लाटली जाते याचा हिशोब विचारायचा कोणाला? या शाळेमध्ये सर्वसामान्य घरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक शाळा मध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात वार्षिक स्नेहसंमेलन घेतली जातात परंतु या साई एंजल इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यानं कडून ११००/- रुपये आकारली जात आहे.११००/- जमा करावे असे मेसेज शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रूप येत आहे.याबाबत काही पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि शाळा संस्थापकास विचारणा केली असता पालकांना अरेरावीची भाषा वापरीत लायकी नसेल तर शाळेत का घातले तुमच्या मुलांना? इतर शाळेत का दाखल करायचे होते.आमच्या नियमनुसार आम्ही फी आकारात आहे तुम्हाला त्याची पावती वैगरे द्यायला आम्ही तुम्हाला बांधील नाहीत असे उत्तर मिळाले. पालक हताश होऊन तिथून मागे फिरले पण काही पालकांनी प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांची भेट घेत घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला असता साठे यांनी लागलीच शिक्षणाधिकारी अरुण कडुस यांना भेटून घडलेला प्रकार व ११००/- रुपये आकारण्यात येणारे मेसेजचे स्क्रीनशॉट दाखवले व त्याची छायांकित प्रत देत त्यांना विचारणा केली की या खासगी शाळेवर फी बाबत निर्बंध नाहीत. शाळांवर राज्यसरकारचे अंकुश नसल्याने शाळा चालकांचा मनमानी कारभार करत आहे अनधिकृतपणे फी आकारली जाते.अश्या प्रकारची वेगवेगळ्या नावाखाली वर्षात किती वेळा फी आकारून लाखो रुपयांची उलाढाल केल्या जाते या पैशांचा हिशोब ठेवल्या जात नाही ना याचे ऑडिट होते हे पैसे कोणाच्या घशात जातात हे माहीत असूनही यावर कोणी बोलत नाही आणि कोणी बोलले तर त्याला राजकीय नेत्यांच्या पंटर कडून धमकविल्या जाते तर कधी कधी मारहाण ही करण्यात येते किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवले आहेत असे अनेक प्रकार घडले आहेत.शाळेत हिंदी मराठी सेलिब्रिटी येणार म्हणून विद्यार्थ्या मार्फत पालकांकडून मोठ्या प्रमाणात अवाजवी फी आकारली जाते काही पालक कामात इतके व्यस्त असतात की ते मागितलेली फी कोणत्या कामासाठी जाणार आहे याची साधी विचारणा सुद्धा करत नाहीत पण सर्वसामान्य पालकांची फी देता देता नाकी नऊ होते.आपल्या मुला बाळाना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून पालक अहोरात्र कष्ट करून खासगी शाळा मध्ये शिक्षण देतात.मुलांचे शैक्षणिक भविष्य बरबाद होऊ नये म्हणून शाळा संचालकांच्या बळजबरीने आकारण्यात येणाऱ्या फी ला बळी पडतात.म्हणून फी च्या नावाखाली चालेल हा सावळागोंधळ व मनमानी कारभार थांबविण्यासाठी आणि आर्थिक लूट करणाऱ्या या खासगी शाळांची चौकशी करून त्यांना योग्यते निर्देश देऊन दोषींवर कारवाई करावी अन्यथा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी वतीने कधीही कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यात येईल असे निवेदन योगेश साठे जिल्हा महासचिव यांनी दिले आहे.अवाजवी फी ला बळी पडलेल्या पालकांनी अश्या मुजोर शाळा चालकांना बळी पडू नये त्यांनी जाब विचारण्यासाठी समोर यावे आपल्या तक्रारी आमच्या कडे किंवा प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी असे आव्हान साठे यांनी केले आले आहे.