देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 11 मार्च : श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, लक्ष्मण खोकले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सुनिल मालणकर यांचे पथक तयार करुन दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले होते.
वरील पथकाने दिनांक 10/03/2025 रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत 06 ते 07 इसम दोन मोटार सायकलवर येवुन मदडगाव गावचे शिवारातील टाकळी काझी ते अंमळनेर जाणारे रोडवर थांबुन सशस्त्र दोरडा घालण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी मदडगाव गावचे शिवारातील टाकळी काझी ते अंमळनेर जाणारे रोडवर पाण्याचे टाकीजवळ अंधारात काही इसम संशयीतरित्या हातामध्ये हत्यारे घेवुन उभे असल्याचे दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन चार इसमांना ताब्यात घेतले व इतर इसम पळुन गेले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) छगन चिंतामण काळे वय-43 वर्षे तळेवस्ती कडा, ता.आष्टी, जि.बीड, 2) महावीर पंढरीनाथ भोसले वय- 39 वर्षे रा. शेरी खु ता. आष्टी जि. बीड, 3) कदम चिंचावन काळे वय- 35 वर्षे रा. तळेवस्ती कडा, ता. आष्टी, जि.बीड, 4) इदगर गारमन चव्हाण वय- 38 वर्षे रा. शेरी खु ता. आष्टी जि. बीड,असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना पळुन गेलेल्या इसमाचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 5) प्रविण हबाजी भोसले (फरार) 6) प्रफुल्ल हबाजी भोसले दोघे रा. पिंपरखेड ता. आष्टी जि.बीड, (फरार) 7) संतोष उर्फ सिंधुशा सुर्यभान काळे रा. गंगापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीगनर (फरार) असे असल्याचे सांगितले. त्यांनी काहीएक माहिती सांगितली नाही. नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांचे कब्जात मुद्देमाल मिळुन आला आहे. 200/- किंमतीची एक लोखंडी कटावणी, 200/-रु कि.ची एक लोखंडी सत्तुर, 500/-रु कि.ची एक तलवार, मिरची पुड, 37,000/-रु कि.चे 3 मोबाईल, असा एकुण रु. 37,900/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी छगन चिंतामण काळे याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 कर्जत जि. अहिल्यानगर 758/2022 भादवि कलम 380,457
2 कर्जत जि. अहिल्यानगर 759/2022 भादवि कलम 307,332,337,34,353,401
3 अंभोरा जि. बीड 112/2016 भादवि कलम 394,34
4 गंगापुर जि. छ.संभाजीनगर 286/2016 भादवि कलम 399,402
5 गंगापुर जि. छ.संभाजीनगर 436/2016 भादवि कलम 395, 120(ब)
6 गंगापुर जि. छ.संभाजीनगर 82/2022 भादवि कलम 399,402
7 गंगापुर जि. छ.संभाजीनगर 86/2007 भादवि कलम 399,402
वर नमूद ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पो.ठाणे येथे हजर करुन, यांचेविरुध्द विरूध्द नगर तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 193/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5), सह आर्म अक्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नगर तालुका पो.ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा