कौतुकास्पद

मिशन आपुलकी अंतर्गत भोगलवाडी शाळेस एक लाख रुपये लोकसहभाग शाळेच्या पाणी सुविधेसाठी ग्रामपंचायत व श्री. बापूसाहेब कार्ले सरसावले

जामखेड दि.26 डिसेंबर (प्रतिनिधी )
जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा भोगलवाडी या शाळेच्या पाणी सुविधेसाठी मिशन आपुलकी अंतर्गत 15 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत व श्री बापूसाहेब कार्ले यांनी तब्बल एक लाख रुपये वस्तूरुपाने लोकसहभाग देऊन दातृत्वाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
भोगलवाडी शाळेस कुसडगाव ग्रामपंचायतकडून 200फूट बोअरवेल घेण्यात आला,परंतु पाणी कमतरते अभावी बोअर वेल खोली वाढविणे गरजेचे होते. शाळेतील शिक्षकांनी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली.कुसडगाव भूमीपुञ युवा उद्योजक तथा कार्यकुशल राजकारणी बापूसाहेब कार्ले,उपसरपंच संतोष भोगल व ग्रामपंचायत सदस्य कल्याण वटाणे यांनी शाळेच्या मदतीसाठी हात पुढे करत स्वखर्चातून 200 फूट बोअर वेल घेऊन दिला व मुबलक पाणीही लागले.
दानशूर व्यक्तिमत्त्व बापूसाहेब कार्ले यांनीही आपले दातृत्व दाखवत स्वखर्चाने मोटार व इतर साहित्य देण्याचे जाहीर केले.जि.प.अहमदनगर कडून सुरु असलेल्या मिशन आपुलकी अंतर्गत तब्बल एक लाख रुपये वस्तूरुपाने दिले.शाळेची पाणी समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत व श्री बापूसाहेब कार्ले यांनी केलेल्या या कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
जामखेड तालुक्याचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब,विस्तारअधिकारी सुरेश मोहिते साहेब,केंद्रप्रमुख नवनाथ बडे साहेब यांनी या दानशूर ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन नेमाडे व श्री. संदिप गायकवाड यांनी विद्यार्थी व शाळा हितासाठी प्रयत्नशील राहून शाळा विकासासाठी ग्रामस्थांचा उत्तम समन्वय ठेवला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे