पारनेर – देवदत्त साळवे, (तालुका प्रतिनिधी)
– मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रं मिळावे यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे १० तारखेपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बुधवारी पारनेर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी नगर- पारनेर मतदार संघाचे आमदार मा.निलेश लंके यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
सध्या मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळल्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पारनेर शहर व तालुक्यातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून सहकार्य करावे असे आवाहन पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा