सामाजिक

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या पत्रकार संघाचा प्रयत्न राहणार: शरद तांबे पत्रकार संघाच्या उत्तर जिल्हा महिला सचिवपदी चैताली हारदेंची नियुक्ती 

राहुरी दि. 10 जानेवारी (प्रतिनिधी) :  ग्रामीण भागातील पत्रकारांना अजूनही अनेवविध समस्यांना सामोरे जावे लागते विशेषतः ग्रामीण भागातील महिला पत्रकारांना म्हणावी तशी योग्य संधी पत्रकारीता क्षेत्रात मिळत नाही. अशा सर्व घटकांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या पत्रकार संघाचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे यांनी केले.
अहमदनगर उत्तर जिल्ह्याच्या सचिवपदी राहुरी तालुक्याच्या जिराईत भागातील शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकातील सर्व सामान्यांच्या व्यथा मांडत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या सौ.चैतालीताई हारदे यांची नियुक्ती करण्यात आली प्रसंगी त्यांना अहमदनगर जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले यांचे हस्ते व शरद तांबे यांचे उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देताना ते बोलत होते.
प्रसंगी पत्रकार शरद ढमक, भगवान लांडे आदी मान्यवर उपस्थित होते
चैताली हारदे यांनी ग्रामीण भागातील महिला पत्रकारांचे मोठ्या प्रमाणात संघटन करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना अधिकाधिक न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा अध्यक्ष महेश भोसले, जिल्हा उपअध्यक्ष उमेश साठे, राहुरी तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, नगर तालुका उप अध्यक्ष संदिप शिंदे, नेवासा तालुका उप अध्यक्ष सन्नी खंडागळे, नगर शहर अध्यक्ष अशोक तांबे, शहर उप अध्यक्ष रोहित गांधी त्याचप्रमाणे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे