अहमदनगर दि. 9 जानेवारी (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अंतर्गत आस्थापनांचे नामफलक मराठीत (देवनागरी लिपीत) लावणे कायदयाने बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व व्यावसायीक, औदयोगिक आस्थापना मालकांनी आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीत (मराठीत) लावण्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त नि.कृ. कवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यत दंड असु शकेल. द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि उल्लंघन करण्याचे चालू ठेवल्यास असे उल्लंघन ज्या कालावधीकरिता चालु ठेवले असेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी दोन हजार रुपयांपर्यंत दंड असू शकेल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा