ब्रेकिंग

हरवलेले व चोरी गेलेले 11 लाख 35 हजारांचे 40 विविध कंपनीचे मोबाईल तोफखाना पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हस्तगत करुन मुळ मालकांना केले परत

अहमदनगर दि. 3 जानेवारी (प्रतिनिधी )
अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजेप्रमाणेच सध्याच्या काळात मोबाईल हि प्रत्येक नागरिकांची मुलभुत गरज झालेली आहे. त्यातुनच गुन्ह्याचा तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे तपास याविविध उपक्रमने तोफखाना पोलीसांनी आपल्या कर्तृत्वातुन नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. असे असतानाच तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणीहुन नागरिकांचे चोरी गेलेले व हवलेले तब्बल 11 लाख 35 हजार रु किं.चे 40 विविध कंपनीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करुन त्यांच्या मुळ मालकांना पो.नि. मधुकर साळवे यांनी आज रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे परत केले. आहे. त्यामुळे नागरिकांनी पो.नि मधुकर साळवे यांना समक्ष भेटुन त्यांच्या कामाचे कौतुक करुन तोफखाना पोलीस स्टेशनचे विशेष आभार मानले.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री.राकेश ओला सो, मा.अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे सो, अहमदनगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी ,नगर शहर विभाग, हरिष खेडकर सो, मा. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तोफखाना पो.स्टे. अहमदनगर यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पो.उप.नि. सचिन रणशेवरे , पोहेकॉ/ दत्तात्रय जपे, दिनेश मोरे, भानुदास खेडकर , पो.कॉ सुमित गवळी , दक्षिण मोबाईल सेल , अहमदनगरचे पो.कॉ नितिन शिंदे यांनी केली आहे.
-: पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना आव्हान :-
नागरिकांनी गर्दिच्या ठिकाणी किवा बाजार करताना आपले मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवु नये. रस्त्यावर सापडलेला मोबाईल किवा चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये. तसेच मोबाईल हरवल्यास किवा चोरी गेल्यास तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे