हिम्मत असेल तर ५ जानेवारीला कार्यालयात येऊन गुन्हा दाखल करावा: अरुण खिची यांचे प्रशासनाला खुले पत्र

अहमदनगर दि.4 जानेवारी (प्रतिनिधी )
मी एक सामान्य नागरिक असुन एकविस वर्षापुर्वी कायदे व नियमाचे स्वतःकडुन पालन व्हावे याकरिता सत्याचा मार्ग स्विकारला खरा परंतु नितीभ्रष्ट वागण्यार्यांची संख्या बहुप्रमाणात होती तरी न्याय हा सत्याच्याच मार्गाने मिळवायचा खोटी तक्रार द्यायची नाही सत्याचाच विजय हा उध्देशपुर्तीचा मार्ग सुरु केला.परंतु कुठे ही सत्याची दखल न घेता बेकायदेशीर वागणार्याना संरक्षण देण्याचे कार्य चौकशी अधिकार्यानी केले. तरी श्रीमद भगवत गीता मधील (कर्मण्यवाधिकारस्ते मां फलेशु कदाचन ) या श्रीकृष्णाच्या वचनावर विश्वास ठेवुन एक दिवस परिस्थितीत बदल घडेल हा आत्मविश्वास कायम ठेवला. येथील स्थानिक वरिष्ठ अधिकारी कार्यालयापासुन तर मुख्य मंत्रालया पर्यंत लेखी पत्रातुन खरी माहिती दिली. परंतु त्या तक्रारी प्रलंबित ठेवून निकाली काढण्यात आल्या.
सत्याची होणारी अवहेलना पाहुन अखेर २०१० मध्ये गृहमंत्री यांचे मंत्रालयास “जशास तसे वागावे हे लोकशाहीचे धोरण असेल तर मला माझा न्याय करावा लागेल सत्यमेव जयते हाच माझा निर्धार आहे त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी घेणार असे लेखी पत्र दिले.
आणी सत्याने विपरित परिस्थितीत परिवर्तन घडविण्यास सुरवात केली. प्रथमता मा.अण्णा हजारे यांचे जनआंदोलन वेळी,त्यांनी दिलेली सत्याची दिलेली घोषणा, त्याग,संयम,शुध्द चारित्र्याचे केलेले गुणगान. त्याच दरम्यान या शहरात जिल्हा सत्र व उच्च खंडपिठासिन न्यायाधीशांनी, पोलीस अधिक्षक श्रीकृष्णप्रकाश यांनी सत्यमार्गाचे अवलंबन करावे यासाठी केलेले प्रबोधन,आवाहन मला प्रेरणादायी ठरले कारण ते ज्या सत्यमार्गाचे प्रबोधन,आवाहन केले तोच मार्ग मी दहावर्षापुर्वी अवलंबवुन सुध्दा मला मात्र न्याय मिळणे तर खुप लांब सत्यमार्गाने दिलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती तदनुसार मी अगोदर स्वतः कायदे व नियमांचे ज्ञान प्राप्त करुन घेतले व कायद्यांचा शोध लेखी पत्राच्या पाठपुराव्यातुन येथील जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया पासुन मुख्य,गृह,विधी व न्याय मंत्रालय मुंबई व औरंगाबाद खंडपिठाचे रजिष्र्टार यांना दिलेल्या पत्राची पुढिल कार्यवाही तर झालीच नाही. याशिवाय कोणतेही योग्य उत्तर हि देण्यात आले नाही.
म्हणुन या लोकशाहीतील अधिकार्यांना कायद्या मधिल खर्या सत्याची जाग आणण्यासाठी सत्याच्या मार्गाने न्याय देण्याचा आदेश द्या अथवा प्रस्थापित लोकशाहीची राजमुद्रा व सत्यमेव जयते या ब्रिदवाक्याचे खर्याअर्थाने पालन केल्याचे कारणास्तव तसा वापर करण्याचा स्वअधिकार व परवानगी द्यावी. असा विनंती अर्ज
मा.मुख्यमंत्री यांचे मंत्रालय,मूख्य राजशिष्टाचार विभाग,प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मूंबई यांना पाठविला परंतु या ६० दिवसात वारंवार कळविले नंतर तशी सहमती दिली नाही किंवा तसा वापर करण्यास प्रतिबंध सुध्दा केला नाही यावरुन वेळोवेळी कळविले प्रमाणे संबधित मंत्रालयीन विभागाकडुन मुक सहमतीने हिरवा कंदील दिल्याचे ग्राह्य धरुन लोकशाहीची राजमुद्रा,व सत्यमेव जयते या ब्रिदवाक्याचा वापर करण्याचा निर्णय दिनांक ५ जानेवारी २०२४ या दिना पासुन सुरवात करत आहे.
तरी या प्रस्थापित लोकशाहीचे मुख्य ब्रिदवाक्य सत्यमेव जयते हेच ७५ व्या वर्षापासुन आज ही असेल तर या ब्रिदवाक्याचा खरा अर्थ काय?त्याचा उपयोग कोणता? तसेच आज ही शासकिय राजपत्रात, प्रशासकीय आदेशात,न्यायालयीन दस्तावैजात, निकाल पत्रावर राजमुद्रा व सत्यमेव जयतेची मोहोर ( शिक्का)का देण्यात येतो. कायद्या प्रमाणे राजपत्र,आदेश, दस्तावैज,निकाल हे खरे का मानले जातात तसेच सत्याच्या मार्गाने न्याय मिळण्यासाठी २२ वर्षाचा पदिर्घ असा कालावधी का लागतो,तसे पण आजमितीस या राष्र्टचिन्हाचे महत्व गांभिर्य राहीलेले नाही. याचा पुरावा मी देतो याचा ही गुन्हा दाखल करणार्यांनी कायदेशीर खुलासा द्यावा.
या भारत देशातील महाभारतात आणी आजच्या लोकतंत्रात सुध्दा नेहमी सत्याचाच विजय होतो हे दाखविण्यासाठी दि.५ जानेवारी पासुन लोकशाहीतील राष्र्टचिन्हाचा वापर करण्याची सुरवात करणार आहे. तदनूसार जर तसा वापर करणे हे बेकायदेशीर असेल तर मागील २२ वर्षात दिलेल्या लेखी तक्रारी व पाठवलेल्या लेखी पत्रातील सत्याला अनूसरुन कायदेशीर दोष कोणता आहे? सत्याचा वादी कोणालाही होता येते परंतु प्रतिवादी मात्र हा सत्यमार्गाचा काटेकोरपणाने पालन करणाराच असतो.