केपीएस कडून नगर सा. बां.वि ला आंदोलनाचा इशारा घोसपुरी सारोळा केडगाव रस्ता दुरुस्ती बाबतीत कडूस पाटील यांचा आग्रह

सारोळा कासार व पंचक्रोशी मधील केडगाव घोसपुरी रस्त्याच्या संदर्भात गेले दोन दिवस भागात चर्चा असून, लोकप्रिय नेते महेश कडूस पाटील यांनी
निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. घोसपुरी सारोळा केडगाव रस्ता खराब प्रतीचे काम व इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम च्या तसेच खाजगी खडी क्रशर वाहनां च्या वर्दळीच्या मुळे प्रचंड खराब झाला आहे.
तरी ज्या वाहनांच्या मुळे रस्ता खराब झालेला आहे त्या वाहनां वर संबंधित विभागाच्या समवेत संपर्क साधून कारवाई करून, रस्ता आम्हाला पंचक्रोशी मधील ग्रामस्थांना चिखली पासून केडगाव पर्यंत दुरूस्त करून द्यावा. याचा फायदा सा. बां.वि च्या रस्त्याला देखील होणारच आहे, तसेच बेदरकारपणे वाहतूक करणारे वर नमूद वाहनचालक यांना देखील आपण तत्काळ शिस्त लावावी ही अशा आशयाचे निवेदन कडूस पाटील यांनी कार्यकारी उप अभियंता श्री. डोंगरे यांना देऊन प्रत्यक्ष चर्चा केली आहे. श्री. डोंगरे यांनी दोन दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन कडूस पाटील व कृषि पदवीधर संघटनेला दिले.
आहे. या वेळी परिवर्तन पॅनल सारोळा चे स्वयंसेवक चेतन साळवे, राम काळे, गुलाब धामणे, शुभम धामणे, व तरूण उपस्थित होते.