उपेक्षित, अनाथ मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : किरण काळे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील मुलांसमवेत साजरा

अहमदनगर दि. 6 नोव्हेंबर (प्रतिनिधी ): आजही देशामध्ये कोट्यावधी लहान मुले, मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. उपेक्षित, वंचित, अनाथ मुलांच्या शिक्षण, उदरनिर्वाह, उज्वल भवितव्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थात्मक देणगीदार, सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या त्याचबरोबर शासनाने पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
काळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. ललिताताई राजेंद्र बलदोटा मेमोरियल फाउंडेशन संचलित बालघर प्रकल्पातील मुलांसाठी मिष्टान्न भोजन कार्यक्रमाचे आयोजन अलतमशभाई जरीवाला फ्रेंड सर्कलच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी काळे बोलत होते.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, कॉंग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, साफसफाई कामगार काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, चंद्रकांत उजागरे, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, सचिव मुबीन शेख, काँग्रेस अपंग विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, राजवर्धन काळे, काव्या काळे, ॲड. अशरफ शेख, ॲड. रिजवान जरीवाला, ज़ाकिर सय्यद, शकील शेख, मुदस्सर जहागीरदार, अफरोज सय्यद, जाहिद शेख, मुसद्दीक मेमन, साहिल सय्यद, फैरोज़ शेख, यूनुस शेख, अमीर सय्यद, वासिम शेख आदींसह मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.
काळे यावेळी बोलताना म्हणाले, मागील महिन्यात वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे यावर्षी वाढदिवस साजरा करायचा नाही असे ठरवले होते. मात्र जरीवाला मित्र परिवाराच्या वतीने अनाथ, वंचित घटकातील मुलांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे सहभागी झालो. सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड आणि त्यांच्या टीमने बालघर प्रकल्पाला आलेल्या अनेक अडी, अडचणींवर मात करून आपल्या सामाजिक कार्यातील सातत्य टिकवून ठेवले आहे. समाजातील दानशूर लोकांनी या प्रकल्पाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
अलतमश जरीवाला म्हणाले, बालघर प्रकल्पाला कायम मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. किरण काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकल्पातील मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न मित्र परिवाराने केला आहे. भविष्यात देखील काळे यांच्या माध्यमातून प्रकल्पाला अधिकाधिक मदत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी गुंदेचा, झिंजे, चुडीवाला, उबाळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रकल्पाला देणगी देखील दिली. प्रास्ताविक युवराज गुंड यांनी केले.