अहमदनगर अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी “यांची” नियुक्ती

अहमदनगर दि. 6 नोव्हेंबर( प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा खान गनी खान यांची अहमदनगर अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांसह एसटी कामगारांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे प्रतिपादन नियुक्तीनंतर बोलताना खान यांनी केले आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा,अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, कॉंग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, चंद्रकांत उजागरे, साफसफाई कामगार काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, विद्यार्थी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, फिरोज युसुफ खान, प्रा. बाबुलाल शफी शेख डॉ. जमीर शेख, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे आदी यावेळी उपस्थित होते.
मुस्तफा खान हे मागील तीस वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी इंटक कामगार विभागामध्ये विविध पदांची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे. नियुक्ती नंतर बोलताना खान म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान, सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षतेचा विचार देशाच्या अखंडतेसाठी टिकणे महत्वाचे आहे. काँग्रेस हाच त्यासाठी एकमेव पर्याय आहे. स्व. नवीनभाई बार्शीकर यांच्या नंतर शहराचा विकास झालेला नाही. किरण काळे हे उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे शहर विकासाचे व्हिजन आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासासाठी काँग्रेस मजबूत करण्याचे काम मी सर्वांना बरोबर घेत करणार आहे.
अनिस चुडीवाला म्हणाले, अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याची काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये अनेकांचे प्रवेश होत आहेत. शहरामध्ये व्यापार, उद्योग वाढीसाठी शांतता असणे आवश्यक आहे. काँग्रेस त्यासाठी काम करीत आहे. खान यांचे नियुक्ती बद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, अल्पसंख्यांक काँग्रेस विभाग प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन वकफ बोर्डाचे चेअरमन आ. वजाहत मिर्झा, जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आ. चंद्रकांत हांडोरे आदींनी अभिनंदन केले आहे.