निधन
माजी नगरसेवक संजय शेंडगे यांना पितृशोक

अहमदनगर दि. 6 नोव्हेंबर (प्रतिनिधी )अहमदनगर महापालिकेचे माजी नगरसेवक संजय शेंडगे यांचे वडील छगनराव रभाजी शेंडगे (वय 71)यांचे आज सकाळी 8 वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर रोहीणीताई संजय शेंडगे यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे एक मुलगी, चार मुले, तसेच नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने नगर शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा अंत्यविधी संध्याकाळी 5.वाजता नालेगाव अमरधाम मध्ये होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांना देशस्तंभ न्युज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐