राजकिय
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आमदार बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व

संगमनेर दि. 6 नोव्हेंबर (प्रतिनिधी )नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आमदार बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे या निवडणुकीच्या निकालाने सिद्ध झाले आहे.
तालुक्यातील गुंजाळवाडी, पिंपळगाव कोंझिरा, आश्वी बु या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे सत्कार लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यशोधन कार्यालयात करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ॲड. माधवराव कानवडे, नवनाथ आरगडे, रामहरी कातोरे, संतोष हासे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
_*फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळत करत कार्यकर्त्यांनी नामदार थोरात जिंदाबाद अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.