ब्रेकिंगसामाजिक

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन योजनेत समाविष्ट असणाऱ्या पंधरा गावातील पाईपलाईनची ट्रायल पीट व (खड्डे) चाचणी करून पुढील काम सुरू करण्याची मागणी अन्यथा कार्यकारी अभियंता यांना काळे फसण्याचा इशारा

अहमदनगर दि.6 नोव्हेंबर (प्रतिनिधी)- मागील 6 महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले असून या घोसपुरी योजने अंतर्गत 15 गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये सात नवीन टाक्यांचे व मोठ्या प्रमाणात नवीन पाईपलाईनचे काम चालु केले आहे. मागील आठवड्यात जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत घोसपुरी योजनेत समाविष्ट असणाऱ्या बाबुर्डी घुमट येथील पाईपलाईन पुन्हा खोदून काढली (ट्रायल पीट)असता त्या ठिकाणी केवळ एक ते दीड फूट एवढीच पाईपलाईन जमिनीत गाडली असल्याचे आढळले. शासकिय नियमानुसार पाईपलाईन ही,जमिन मुरमाड , खडकाळ किंवा काळी मातीची असली तरीही त्या पृष्ठभागापासून किमान 1.14 मीटर (3 फूट 9 इंच ) एव्हडी खोल असावी . शासननाने हे सर्व निकष लक्षात घेऊनच या योजनेसाठी तब्बल 50 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. परंतु ठेकेदार हा पैसा वाचवण्याच्या हेतूने आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाईपलाईन फूट भर देखील जमिनीत गाडत नाही.पाईप वरवर असल्याने त्यावरून जड वाहतूक झाली, नांगरट किंवा पाण्याच्या अती दाबाने काही महिन्यांतच ही सर्व पाईप लाईन फुटेल यात अजिबात शंका वाटत नाही. हे काम खराब झालेले असताना देखील, स्वतः आपण आपल्या सहीने, ठेकदारास जवळपास दहा टक्के बिल अदा केलेले आहे. संबंधीत या योजनेतील कुठलेही बिल कामाची शहानिषा केल्या शिवाय अदा करूनये तसेच स्वतः अधिकारी या सर्व (ट्रायल पीट) खड्डे चाचणी घ्यावी व खड्डे चाचणी येणाऱ्या आठ दिवसांत करावी करण्याच्या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस एम मोरे यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शेखर पंचमुख, योगेश भालेराव, भीमा कराळे, दीपक गुगळे, अमित गांधी, निलेश सातपुते आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की येत्या आठ दिवसात ट्रायल पीठ खड्ड्याची चाचणी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी यांना काळे फासण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे