दगडवाडी येथील “हा” कलाकार श्रोत्यांना आपल्या आवाजाने करतोय मंत्रमुग्ध!

पाथर्डी( प्रतिनिधी वजीर शेख)
पाथर्डी , तालुक्यातील दगडवाडी येथील अरुण उमाप व त्यांची पत्नी सुनीता उमाप ,हे दगडवाडी येथील रहिवासी आहेत, त्यांना शेतीवाडी नाही, त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे , यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती,मुले मोठी झाली घरखर्च भागविण्यासाठी त्यांना काहीच पर्याय नव्हता,पर्ंन्तु त्यांनी गेली पंधरा वर्षे पासुन गावोगावी जाऊन आपल्या,आराधी , देविचे गाणे म्हणत आपला उदरनिर्वाह चालवत आहे,आज ते पाडळी या गावी आले असता ,त्याची विचारपूस केली,कारण एक कलाकार दुसऱ्या कलाकारांची भावना ओळखत असतो ,उमाप यांची खुप दिवसांपासुन इच्छा होती की मला कोणी तरी प्रसार माध्यमांनी माझे गाणी प्रदर्शित केली पाहिजे परंतु आज पत्रकार वजीर शेख यांच्या माध्यमातून त्यांना आश्र्वासन दिले व तसेच त्यांना मानधन कसे मिळेल यासाठी मि, स्वता पाठपुरावा करणार आहे , त्यांना हे ऐकून खुप आनंद झाला व त्यांनी मला मनापासून आशिर्वाद दिला