गुन्हेगारी

कर्जत पोलीसांची अवैद्य गांजा लागवडीवर आळसुंदे गावाच्या शिवारात मोठी कारवाई कर्जत पोलिसांच्या कारवाईत ४,२९,८२०/- रु किं.चा एकुण २१.४९१ किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त

अहमदनगर दि. १२ सप्टेंबर (प्रतिनिधी)
सविस्तर हकीगत अशी की दि 11/09/2023 रोजी कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत आळसुंदे ते कोटीं रोडचे बाजूस एक इसम याने त्याचे शेतात गांजा पिकाची लागवड केली याबाबत माहिती समजल्याने कर्जत पोलीसांनी आळसुंदे गावचे शिवारात कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये ४,२९,८२०/- रु किं.चा एकुण २१.४९१ किलो ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा ओलसर झाडे असलेला गांजा किंमत २०००० रुपये किलो प्रमाणे जप्त करण्यात आला आहे. आळसुंदे ते कोटी रोडलगत ईसम नामे बाळु मारुती गाडी, वय ४५ वर्षे, रा. आळसुंदे, ता. कर्जत याने त्याचे शेती गट नंबर ३३० मधिल शेतात मिर्चीचे पिकात गांजाची झाडे लावल्याचे निष्पन्न झाले असुन, त्यास ताब्यात घेण्यात आले आहे तसेच कर्जत पोलीस स्टेशन येथे त्याचेविरुध्द गुन्हा दाखल करावयाचे काम सुरु आहे. सदरची कारवाई मा. राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधीकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. घनशाम बळप, पोसई / प्रदिप बो-हाडे, पोसई/ मंगेश नागरगोजे, पोना/ पी. टी. भांडवलकर, पोकों/शाहुराज तिकटे, पोकों/ कोल्हे, पोकों/कोहक, पोकों/सुपेकर, चापोकों/बेग सर्व नेमणुक कर्जत पोलीस स्टेशन तसेच श्री. प्रदिप ठोंबरे (नायब तहसिलदार) तहसिल कार्यालय कर्जत, श्री. मोराळे, तलाठी, सजा आळसुंदे, ता. कर्जत व कृषी कार्यालय, कर्जत यांचे कर्मचारी यांनी केली असुन, सदर कारवाई दरम्यान पंच, फोटोग्राफर, मापारी हजर होते. पुढील कारवाई पोसई/मंगेश नागरगोजे करत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे