कौतुकास्पद
शूर सरसेनापती “संताजी” पुस्तक भेट देत दादासाहेब रूपवते विद्यालयात शिक्षक दिन साजरा

अहमदनगर दि. ५ सप्टेंबर (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक शाळा,महाविद्यालये या ठिकाणी विद्यार्थी शिक्षकाची भमिका वठवत अध्यापन करण्याचे काम करत असतात.
या शिक्षकदिनी पोलीस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर पाटील (I.P.S) लिखित शुरसेनापती “संताजी” हे पुस्तक नव्यानेच बहुजन शिक्षण संघावर कार्यकारी रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती झालेले संदिपजी सदाफुले सर यांना “संताजी” हे पुस्तक दादासाहेब रूपवते विद्यालयातील कार्यालयामध्ये भेट देत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक महेश भोसले,प्राचार्य शेख सर, प्रा.जयंत. गायकवाड,महेंद्र कदम सर , अजय भिंगारदिवे सर, संजीवन साळवे सर,रायकर सर, नितीन कसबेकर,भीमराव जाधव , आदी उपस्थित होते.