कौतुकास्पद
५ सप्टेंबर शिक्षक दिनी तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे राज्यस्तरीय उत्कृष्ट सायबर तज्ञ म्हणून होणार सन्मान

अहमदनगर दि.४ सप्टेंबर (प्रतिनिधी)-स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट सायबर तज्ञ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि.५ सप्टेंबर रोजी केलेले आहे.
नुकतेच सायबर सेल मधून तोफखाना पोलीस ठाण्यात बदलून आलेले व तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकाचे प्रमुख डॅशिंग पोलीस उपनिरीक्षक श्री.सचिन रामनाथ रणशेवरे यांना उत्कृष्ट सायबर तज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.श्री.रणशेवरे यांच्या सायबर सेल मधील कामाची दखल घेत सायबर तज्ञ,सायबर वक्ता,सायबर एक्सपर्ट,सायबर योद्धा या उपाध्यानी स्व.पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांना गौरविण्यात येणार आहे व तसेच पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पै.नाना किसन डोंगरे यांनी दिली.